You are currently viewing कशाला घ्यायचा गर्दीत मुका

कशाला घ्यायचा गर्दीत मुका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशाला घ्यायचा गर्दीत मुका*

 

वाटतात पाहून किती सुखी

रहावे जाऊन त्यांचेच *घरी*

रोज उठूनची *मारामारी*

झेपत नाही आता *खरी*

//1//

किती हासरे *चेहरे गोड*

घेतल्ये मेहनत *भरपूर*

काका देणारेत सन्मान पत्र

गावोगावी होणारेत सत्कार

//2//

एक दिवसाची हसरी गॅलरी

कोमेजून जाईल उद्या सकाळी

चोळत बसतील *पाय दुखरे*

गायब होता कुणाची कवळी

//3//

उसन हसण कां टिकतं कधी

रात्र म्हणेल *दुखली कंबर*

ताटकळत होतो जेवणासाठी

नाही लागला *लवकर नंबर*

//4//

असून बोल हे *अनुभवाचे*

नाही करीत *उगाच टीका*

हाऊस करावी कुवत पाहून

कशाला घ्यायचा गर्दीत मुका

//5//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

0110/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा