You are currently viewing स्वयंप्रज्ञ अनुपम आहे देव हनुमंत

स्वयंप्रज्ञ अनुपम आहे देव हनुमंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संगीतकार गीतकार श्री अरुण गांगल यांची श्री हनुमान जयंती उत्सव निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

*श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!*

स्वयंप्रज्ञ अनुपम आहे देव हनुमंत
श्री रामचंद्राचा भ्राता निस्सीम भक्त।।ध्रु।।

बुद्धिमान अचपळ मुत्सद्दी रामदूत
चतुर्वेद ज्ञाता नऊ व्याकरण पंडित
वाक् पटु मधुर वाणी करी संमोहित।।1।।

सावधान सतर्क राही प्रत्येक गोष्टीत
विनम्र सेवक द्रष्टा वागे समयोचित
कुशल संघटक व्यवस्थापन करी उचित।।2।।

कपिचे मन स्थिर निष्पाप विकार रहित
सर्वां प्रिय निगर्वी पराक्रमी वायूसूत
ध्येयवादी जगजेठी सदा सत्कर्म करीत।।3।।

बुद्धी शक्ती भक्ती वक्तृत्व ब्रह्मचर्य व्रत
मानस शास्त्रज्ञ चतुरस्त्र गदाधारी सशक्त
रुद्रावतार चिरंजीव सर्वव्यापी स्वयंसिद्ध।।4।।

काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत, रायगड.
पिन.410201.Cell 9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा