You are currently viewing सदानंदाचा येळकोट करू पुकार

सदानंदाचा येळकोट करू पुकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी, गीतकार, गायक, संगीतकार श्री.अरुणजी गांगल लिखित श्री खंडोबाचे नवरात्रानिमित्त अप्रतिम काव्यरचना*

सदानंदाचा येळकोट करू पुकार
एळकोट एळकोट जय मल्हार IIधृII

ऋषी आज्ञे मणी मल्ला चा करुनी वध
लिंगद्वये रूपे चमत्कार दावीत
मार्गशीर्ष चंपाषष्ठीस देव अवतारII1II

खंडोबाची पाच प्रतीके सर्वज्ञात
लिंग तांदळाचे मुखवटे मूर्ती टाकं
धातुंच्या प्रतिमा सरळ बसलेले घोडेस्वारII2II

भैरव अवतार मल्हारी मार्तंड
बानू म्हाळसा पती शोभे म्हाळसाकांत
खंडामंडित खंडोबा शिवअवतार II3II

खंडोबाच्या चतुर्भुजा शोभती छान
खड्ग त्रिशूळ डमरू रुधिरमुंड
पानपात्र नंदी अश्व श्वान सेवा तत्परII4II

अनेक पत्री खंडोबास वाहती भक्त
पुरण रोडगा हळदी खोबरे नैवेद्य
नवसां पावे देव किर्ती अपरंपार II5II

जागरण भजन गोंधळ तळी भरतात
वारी खंडोबाची वाघ्या मुरळी देती प्रसाद
दिवटी ओवाळती वाहती बेलभंडारII6II

खंडोबा महाराष्ट्राचे आहे कुलदैवत
कर्नाटकात खंडोबाचे असंख्य भक्त
वंदूया खंडोबास देईल शुभ वर।।7।।

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410201. सेल.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा