You are currently viewing आरती श्रीशंकराची

आरती श्रीशंकराची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम आरती*
(साकव्य आरती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट)

*🙏 || आरती श्रीशंकराची || 🙏*

जय देव जय देव शिव शंभो त्रिपुरारी
भवतारक देवा हे त्रिनेत्रधारी ||
जय देव जय देव || ध्रु ||

त्रिशूळ डमरू शोभे सर्पमाळ गळा
रुद्राक्षधारी हा शिवशंकर भोळा
भोलेनाथासी भक्तांचा लळा
अभयदान देई त्याचा तिसरा डोळा ||
जयदेव जयदेव || १ ||

कैलासाधिपती गिरिजावर देवा
कृपा करावी तुझी नित्य घडो सेवा
शिव शिव स्मरता भुक्ति मुक्तिचा ठेवा
नाम जपो वैखरी ही तुझे सदाशिवा ||
जय देव जय देव || २ ||

लयतत्त्व स्वामी तू विश्व नियंता
तुझ्या कृपाप्रसादे लाभो शांतता
बुद्धी दे शक्ति दे देई तुष्टता
श्रीविश्वनाथा देई सौख्य या जगता ||
जय देव जय देव || ३ ||

प्राशुनी हलाहलासी रक्षिली अवनी
तुज सम नाही त्राता अवघ्या त्रिभुवनी
गौरीहरा तव कृपेने आश्वस्थ हो धरणी
विश्वदयाळा ज्योत्स्ना लीन तुझ्या चरणी || ४ ||
जय देव जय देव शिव शंभो त्रिपुरारी
भवतारक देवा हे त्रिनेत्रधारी ||
जय देव जय देव ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे. ५८

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा