You are currently viewing बहाणा

बहाणा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*

 

*बहाणा*

 

अहो पाव्हणं…पाव्हणं तुम्ही…

नका करू पाव्हणं कसला बहाणा

एकदा तरी… अहो पाव्हणं

पाव्हणं एकदा तरी घरला याना || धृ||

 

तुम्ही भेटावे केले सोळा सोमवार

वाट पहाते करून सोळा श्रुंगार

सजविला छान मखमली बिछाना

पाव्हणं एकदा तरी घरला याना ||१||

 

राघूवर फिदा झाली मंजूळ मैना

तिच्या दिलाची हाक समजून घ्या ना

प्रित फुलाच्या मकरंदाची गोडी चाखाना

पाव्हणं एकदा तरी घरला याना ||२||

 

पिंजऱ्यात पाखराची होती फडफड

कसं सांगू दिलाची होती या धडधड

प्रीतीच्या पिंजऱ्याची कडी उघडा ना

पाव्हणं एकदा तरी घरला याना ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा