You are currently viewing नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले ‘भालेकर राजा’चे मनोभावे दर्शन
Oplus_16908288

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले ‘भालेकर राजा’चे मनोभावे दर्शन

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि भाजपचे युवा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली दिलीप भालेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या ‘भालेकर राजा’चे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवानिमित्त शहरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, हा उत्सव सर्वांनी शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी भाजपचे सरचिटणीस दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, जय भालेकर, ओंकार भालेकर आणि सचिन सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा