*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*व्यक्ती आणि कला*
प्रत्येक जिवा पाशी काहीतरी कला असतेच. गुण असतातच. आपला आपण मागोवा अंतरापासुन घेतला तरच आपले कला गुण समजतात.
काहीजण समजले तरीही दुर्लक्ष करतात. ऊदासीन रहातात.
त्यांना जीवन जगायचे कसे?आनंद मिळवायचा कसा? खरे सुख कशात आहे… हे काही समजुनच घ्यायचे नसते.
परंतु बरेचसे लोक समज आल्यावर आपल्या आवडी निवडीचा विचार करतात. निश्चित लक्ष्य व मार्ग ठरवतात आणि कुवतीनुसार कला गुण जोपासतात. हौस किंवा छंद म्हणुनही ते हा मार्ग ठरवून ठेवतात.
काही बुद्धीवान, विचारी हे आपल्या आवडीची कला हे आयुष्याचे ‘ध्येय’ठरवतात. त्यात अपार मेहनत घेतात. जिद्दीने पूढे जातात व आयुष्यात कलावंत म्हणुन
किर्तीवंत होतात.
कला जोपासली तर ती विरंगुळा , मनोरंजन यासाठी ऊपयोगी ठरते. आपली कला आपल्याला भरभरून आनंद देते.
व्यवसाय म्हणुन स्विकारल्यास मेहनत व जिद्द लागते. त्यातुन नाव व पैसा मिळवता येतो.
ध्यास म्हणुन कला जेव्हा तन मनव्यापून टाकते तेव्हा वयाचेही भान ऊरत नाही.
जसे “ध्यासासाठी जन्म आपला”असेच स्विकारले तरच कला वैभवाच्या शिखरावर जाऊन बसवते.
गायन, नर्तन वादन, शिल्प, चित्र, व्यंगचित्र, छायाचित्रण, काही वस्तूंचा संग्रह करणे, साहित्य, नाट्य, वक्तृत्व, नेतेगिरी, इ. कला आपण जोपासू शकतो.
सातत्य, सराव, यातून वाढवू शकतो.
जिद्द व मेहनतीने यश मिळवू शकतो.
आता गायनात भारतरत्न पदा पर्यंत पोचलेले मा. पं. भीमसेन जोशी ,
विदुषी प्रभाताई अत्रे हे गायनात ध्यास घेतल्यामुळेच किर्तीवंत झाले.
प्रत्येक कलेत ध्यासच हवा.
तेव्हाच पू.ल
. देशपांडे, बालगंधर्व, किशोरीताई आमोणकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे लो. टिळक, गदिमा, अशी रत्न प्रसिद्धीस तर पोचतातच पण काळही त्यांची कलेतली जागा पुसून टाकू शकत नाही. कलेने ते अजरामर रहातात.
लोक त्यांना विसरू शकत नाहीत ऊलट त्यांचा आदर्शच ठेवतात.
कलाकार हा कला जेव्हा यशस्वी होते तेव्हा खरे सुख मिळवतो जे मृत्यूनंतरही अविनाशी ठरते.
मन:शांती, लोकांकडुन आदर, संवेदनशीलता, समाजाप्रती बांधिलकी तो कलाकार मानतो.
आपल्या कलेचा आनंद घेणारे रसिक किंवा वाचक तसेच श्रोते यांना आपल्यापेक्षाही श्रेष्ठच मानतो.
यातुन परिपक्वता येते. मीपणा अहंकार नाहीसा होतो. विश्वाशी नाते मानवता म्हणुन जोडले जाते. स्वत:कलाकार तेव्हाच प्रगल्भ होतो. टिका आणि प्रशंसा दोन्ही पचवू शकतो.
विवेकाच्या खिडक्या ऊघड्या होतात. व्यक्ती डोळस होते. अध्यात्माकडे मन ओढले जाते. ज्ञानभांडार समृद्ध होते.
कलाच कलाकाराला व्यक्ती म्हणुन खास अशी ओळख, समाजात आदराचे स्थान, देते. शब्द शब्द जोडण्याची आवड निर्माण होते.
मिळणारे पुरस्कार, बक्षिसे, सन्मान हे सारे आनंदात भरच घालते.
कोणतीही अभिजात कला ही मागच्या पिढीने पुढच्या पिढीला दिलेला संस्कार वारसा असतो.
त्यामुळेच कला समृद्ध होते व कलाकार संपन्न होतो.
आपले अभिजात हिंदूस्थानी शास्त्रीय संगित हे वैदिक काळापासुनची गायन वादन व नर्तन म्हणुन ओळखलेली परंपरा आहे म्हणजेच संस्कृतीचा वारसा आहे.
आज या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, अवास्तव अपेक्षांच्या युगात अशा कला जोपासणे व हा संस्कार वारसा पुढे नेणे तसे कठीणच आहे तरीसुद्धा कलेला वाहुन घेणारे थोरलोक तरूणपणातच यशवंत होत आहेत. शास्त्रीय गायन तसे कठीण पण त्याचा सुद्धा एक मेहनती कलाकार व श्रोतेवृंद तयार आहेत.
कोणतीही कला कधी नष्ट पावत नाही. विस्मरणात जात नाही परंतु आता काही कलेची साधने बनवणारे हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच कारागीर ऊरलेत. रूद्रवीणा, सतार, सारंगी मृदूंग आता फार थोडे लोक बनवतात.
नवनविन वाद्य येऊ घातलीत.
अपवाद म्हणुन काहीच कलाकार मनस्वी, स्वछंदी असतात.
पण कला माणसाला माणुस म्हणुन जगायला आणि संस्कृतीचा वारसा पुढे न्यायला फार गरजेची आहे.
आयुष्यावर प्रेम करत जगण्याचा ऊत्सव कलागुण करतात हे नक्कीच.
*अनुराधा जोशी*
9820023605*
