*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आरास गणरायाची*
गणराय आगमनाची
लगबग सुरू झाली
शुभ आरास मखराची
सारी दुकाने सजली
दारी सडा सारवण
रंग रंगीत रांगोळी
मंगल तोरण दाराला
लक्ष दिव्यांच्या या ओळी
चंदनाचा पाट ठेवा
बाप्पा गणराया बसाया
रिद्धी सिद्धी उभ्या दोघी
मंगल आरती कराया
चांदीच्या तबकात
प्रसाद ठेवु मोदकांचा
लावु समई निरांजन
गुच्छ पुढे जास्वंदीचा
सुवासिक धुप दिप
तेजोमय दिप पुढे
पंच पदार्थांचा ठेवा
आरती म्हणुया गडे
बाप्पा बसला मखरी
नतमस्तक होऊ या
आयुष्य भराचे सुख
देई माझा गणराया
*शीला पाटील चांदवड*
