You are currently viewing गोंगाटा विना करू साजरा

गोंगाटा विना करू साजरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गोंगाटा विना करू साजरा*

————————————-

 

मंडपात बाप्पाचा चेहरा हवा हासरा

गोंगाटाविना करू या गणेशोत्सव साजरा

 

ढोल,ताशा,डीजे ने काय साध्य होणार?

ज्येष्टांसकट सारे जण बधिरतेत जाणार

सैलावून घेऊ या जरा विचारांचा कासरा

गोंगाटाविना करू या गणेशोत्सव साजरा

 

रुग्णांची काळजी आपणच घ्यायला हवी

रक्तदाब, हार्ट प्रॉब्लेम यातून सुटका द्यावी

विवेकी विचारांचा थोडा घेऊ या आसरा

गोंगाटाविना करू या गणेशोत्सव साजरा

 

फुले, पान, आरतीने करू गणरायाची भक्ती

उठवळ नाच, गाण्यांतून करू त्यांचीही मुक्ती

सर्वत्र दिसू लागेल मोर आनंदाचा नाचरा

गोंगाटाविना करू या गणेशोत्सव साजरा

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

मोबाईल 9130861304

प्रतिक्रिया व्यक्त करा