You are currently viewing सोनपरी

सोनपरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.नीलांबरी गानू यांनी श्रेयंकाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं अप्रतिम काव्य*

*सोनपरी*

क्षितिजाच्या रेषेवरून सोनपरी धरुनी ढगांचा हात
स्वर्गातून आली चालत परी श्रेयंका गगनात

इंद्रधनुषी रंगांच्या रिबीनिने जणू केस सावरले
तरीही चार केस कपाळावर होते नर्तनात दंगलेले

सुकोमल पावलां कोणी घातले लाल बूट काचेचे
चांदण्यांचा घातला आहे फ्रॉक हे तर काम पऱ्यांचे

उषा नटवते चेहऱ्याला करी मेकअप लाल रंगाने
भाळी चंद्रकोर हसली की सुरू व्हावे दिवसाने

श्रेयंका राजकन्या चालते आजोबांचे बोट धरून
दोन पिढ्यांचा संगम सत्य निरागसतेचा म्हणून

डॉ नीलांबरी गानू

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − five =