You are currently viewing कुंकू

कुंकू

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*कुंकू*

शक्तीचं प्रतीक आहे नारी
कुंकू असू दे ग तु भाळी
लाज वाटते कुंकवाची तर
टिकली तरी लाव कपाळी

कधीतरी सावित्रीच्या
भाळातलं कुंकू बघाव
ज्ञान ज्योती कशी उजळली
आत्मसात तेही करावं

कधीतरी जिजाऊच्या
भाळातलं कुंकू बघाव
स्वराज्यासाठी कशी लढली
तेही जरा जाणून घ्याव

कधीतरी रमाईचंही
भाळातलं कुंकू बघाव
संविधानाची जननी ठरली
एकदा तीला ही पुजावं

म्हणून मी पुन्हा सांगतो
कुंकू असू दे ग तु भाळी
लाज वाटते कुंकवाची तर
टिकली तरी लाव कपाळी

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =