You are currently viewing उंबरा

उंबरा

उंबरा

सुखाला दाराशी येऊ तरी द्या,
का उंबऱ्यावर गर्दी करता?

माप ओलांडूनी प्रवेश करू तरी द्या,
का आधीच पाठ दाखवता?

सुखाने घर भरू तरी द्या,
का निराशेनेे खण भरून ठेवता?

सुखाला मन भरून पाहू तरी द्या,
का पापण्यांवर दुःख साठू देता?

हास्य ओठांवर खुलू तरी द्या,
का पाकळ्या घट्ट मिटूनी घेता?

सुख हृदयी विसावू तरी द्या,
का मळभ दुःखाचं हृदयी दाटू देता?

सुखाची अनुभूती एकदा तरी घेऊ द्या,
का सुखाचीही भीती मनी बाळगता?

सुखाला दाराशी येऊ तरी द्या….
का उंबऱ्यावर गर्दी करता????

(दिपी)
दीपक पटेकर
९४२१२३७५६८

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + two =