You are currently viewing वैदर्भीय वर्हाडी मराठी भाषा
Oplus_16908288

वैदर्भीय वर्हाडी मराठी भाषा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित पत्रप्रपंच*

 

(वैदर्भीय वर्हाडी मराठी भाषा)

 

प्रिय चि. सौ.कस्तुरी

अ. आ.

 

 

माह्यावालं पत्र पाहून तुले लई हरिख येईन हे मालूम हाये मले.

म्हनुन तर लिव्हुन राह्यली. थो शेजारचा बाप्पू येऊन राह्यला न तुया गावले , आज त्याच्याबरोबर शिदोरी दिली तुयासाठी अन पत्र बी लिव्हतें हाये. तूच त मले लिहा वाचाले शिकवलं न बापा.

ही मऱ्हाटी भाषा हाय आपली पन मांगच्या हपत्त्यात थो किसना आलता तर थो बंबईया हिंदीत बोले साऱ्याईशी, असं झापलं म्या त्याले म्हणलं अरे तिकडचे लोक इथं येऊन मऱ्हाटी शिक्त्यात त्या गोऱ्या बाया मी म्र्हाठी बोलत्यात अन तू कौन आस बोलतं बा,बिचाऱ्या जास्तिच आली का बापा बंबई तुह्या अंगात देऊ काय एक लगावून सुनबाई म्हनें बी आत्याबाई कायले बोलता वॊ त्याइले आसं ! म्या म्हनलं मंग तिले घाबरतो काय मी? तवा शरमला जरासाकं. त्याले एक व्हीडिओ बी दाखीवला तेंव्हा बसला गप.

आपन मराठी मानसं! आपनच आपल्या भाषेचा अभिमान ठुवला पाहिजे ह्ये मला अनाडीला समजते (कावून हासून राह्यली मले)किती साजरी आहे मऱ्हाटी . इथंच जना बाई तुकाराम गोरोबा अशा संतांनी संत साहित्य लिव्हले ज्ञानेश्वर महाराज किती कोवळया वयात ज्ञानेश्वरी लिहिली आमी तर मंदिरात पसायदान बी म्हनतो रोज , बह्यनाबाई तिच्या सार्या ओव्या मुखपाठ हायेत मले, अन ज्ञानदेव महाराजांचा थो हरिपाठ लय झकास! आजून एक सांगू का बाई, म्या मागच्या वाक्ती एक निबंध लिव्हला होता की नाई त्याच मले पह्यल बक्षीस बी मिळालं बिचारे त्या वाक्ती त्या शुभांगी ताईन त्याईन लिव्हलेलं हरिपाठवरचं पुस्तक बी देल्ल मले , लय साजर हाये ते रोज वाचतो ना मी, तू म्हनशील बुढी लयच हुशार झाली मंग? सारं जग चाल्ल पुढं मी थोडी मागं राहणार?कस्तुरे काल किनी इकास दादांनी माय माऊली मऱ्हाटी वर लेव्हाले सांगितलं तूच तर जोडलं मले ह्या समूहात इसरली का वं? तर दिवसभर बम कविता लिव्हल्या सार्यांइन मी नुसतं वाचतच बसली बा मले बी लिहाव्ह वाटे पन समजेच ना काय लिव्हु थे यमकात जमलं पाहिजे ना बॉ

अन पाच कडव्यात सार कसं सांगू आपली मऱ्हाटी तर लय श्रीमंतीन आहे बाई किती प्रकार किती कवी .अभंग , ओव्या पोवाडे लावण्या अन ते शिवाजीच्या काळातले भाट । सारंइच आवडते मले , बाळाचा पहिला शब्द आ आ ऊ ए मऱ्हाटीतच हाय किनी! त्या मदर मध्ये नाय ते प्रेम अन थे मम्मी–😊 वारे वा काय बी थ्या कबरीत कवा असते माय बापा मले त समजतच नाय !

जाऊ दे आपल्याला का करा लागते? मले तर लय अभिमान हाय मऱ्हाठीचा अन काल बिचारे त्या टिव्हीत बि एकडाव सांगितलेलं हाय की आता मऱ्हाटिले अभिजात मऱ्हाटी म्हनुन मान देऊ मी तर पेढेच वाटले बा राती

बाई माय मऱ्हाठीबद्दल इशय निगाला की असं होते माझं

बरं बाई थांबते आता नायतर–

पोरगी मॅट्रिकले हाय न तुयी, बाई, तिले तू मऱ्हाटी शायेतच टाकलं लय बेस केलं बिचारे आपनचं मऱ्हाठीचा मान वाढीवला पाहिजे

बाप्पू कशे आहेत सारेजण सुखात राव्हा हीच मायीं देवाले इंनंती।

पत्र धाडजो वो बाई

वाचशीन वॊ पोट्टे माह्यावालं पत्तर पुरं

नायतर ठिवून देशील तसंच

माय कायबी लिव्हतें म्हून

 

तुझीच माय

उत्तर पाठवजो ग बाई

 

🌷🌷🌷🍫🍫🍫🍫

प्रतिक्रिया व्यक्त करा