You are currently viewing पंचकर्म ( बस्ती)
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

पंचकर्म ( बस्ती)

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या बियोंड सेक्स पुस्तकाच्या लेखिका, मॉडेल सोनम गोडबोले यांचा लेख

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.. पोट साफ होइल तो क्षण हे प्रत्येकजण कबुल करेल. पण रोजचं पोट साफ होणं आणि deep cleaning and oiling होणं म्हणजेच गाडी घरी पुसणे आणि बाहेरुन क्लीन करुन आणणे या फरकाइतका तो फरक असतो.
मी डॉक्टर नाही पण दरवर्षी गेली अनेक वर्षे बस्ती करते.. खरं तर बस्ती पावसाळ्यात करतात कारण पावसाळ्यात आपल्या शरीरात वात वाढतो आणि भजी खाऊन आपण तो अजुन वाढवतो पण लॉकडाउनमुळे या वर्षी बस्ती करायला उशीर झाला पण गेले दोन दिवस पाऊस पडतोय त्यामुळे पावसाळ्यात बस्ती केल्याचा फील येतोय😃..
वर्षांतुन एकदा बस्ती केली आणि व्यायाम आणि आहार याकडे लक्ष दिलं तर वर्षभर डॉक्टरकडे जावं लागत नाही हा माझा अनुभव आहे.. वमन विरेचन थोडं हेक्टीक आहे पण बस्ती एकदम बेस्ट . केली नसेल तर एकदा जरुर करुन पहा. खूपदा मला प्रश्न विचारला जातो तुझ्या शरीरावर ग्लो कसा ?? काय वापरतेस?? .. मी खूपदा सांगते मी कधीही स्पा किवा पार्लर ला जात नाही.. बस्ती केली की दुसऱ्याच दिवशी तुमच्या शरीरावर ग्लो दिसायला लागतो कारण पोटातील घाण निघुन जाते.. उष्णता कमी होते पित्त कमी होतं म्हणजेच काय तर पोट साफ झालं की बरेचसे आजार दुर होतात . वर्षांतुन एकदा बस्ती करुन तुम्हीही हा अनुभव घ्या..
व्यायाम करा .. घरचं जेवा आणि निरोगी रहा..

सोनल गोडबोले
लेखिका .. बियॉन्ड सेक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + thirteen =