You are currently viewing मीनाकुमारी एक लेजंड..किवदंती…..

मीनाकुमारी एक लेजंड..किवदंती…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख*

*मीनाकुमारी एक लेजंड..किवदंती…..*

।।न इंतजार ,नआहट,न तमन्ना,न ऊम्मीद…
जिंदगी है कि यूं बेहिस हुई जाती है..।।

३१मार्च हा ,जिने १९६०चे बाॅलीवुडचे दशक तिच्या सजीव अभिनयाने,तिच्या मृदु आणि रसपूर्ण आवाजाने आणि स्वर्गीय सौंदर्याने गाजवले ,त्या ह्रदयस्थ मीनाकुमारीचा स्मृतीदिन….त्या निमीत्ताने या अभिनय सम्राज्ञी ,कवियत्री विषयी मनातले बोल…
मीनाकुमारीचे जन्म नाव महजबीन.महजबीन म्हणजे चंद्रमुखी…आणि खरोखरच चंद्रालाही लाजवेल असेच तिचे लावण्य… तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.
जन्मत:च तिला अनाथाश्रमाच्या दारात सोडले होते..पण पित्याने पुन्हा त्या चिमुकल्या जीवाला ऊचलले.काळजापाशी धरले.तेव्हां त्या बालजीवाच्या पाठीला मुंग्या डसल्या होत्या.तेव्हांपासूनच या ट्रॅजेडी क्वीनच्या वेदनांना सुरवात झाली असावी.
तिच्या समकालीन अभिनेत्री,नर्गीस, गीताबाली ,मधुबाला,
निम्मी ,नूतन, वैजयंती माला ,वहीदा रहमान यांच्याविषयीही प्रेक्षकांना खूप आकर्षण होते पण तरीही
मीनाकुमारीची लोकप्रियता अलौकिक होती …तिच्या व्यक्तीमत्वात विलक्षण ओढ होती.तिच्या चेहर्‍यावरचे
विसावलेले भाव प्रेक्षकांशी नातं जुळवायचे.प्रेक्षक
नुसतेच तिचे चाहते नव्हते तर भक्त होते…
तिच्या नजरेतील स्निग्धता,भावुक ,ओलसर,ह्रदयाच्या गाभार्‍यातून ऊमटलेला स्वर ,याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही….
या तारांगणात तिने बालकलाकार म्हणून पाउल टाकले.विजय भट यांच्या चित्रपटात ती बेबी मीना म्हणून चमकली.आणि तेव्हांपासून महजबान मीनाकुमारी झाली…बालकलाकार , सहसा नंतरच्या आयुष्यात ,चित्रपटजगतातून लुप्त होतात हे विधान
तिने मात्र खोडून काढले…बालकलाकार ते चरित्र नायिकेपर्यंतचा तिचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांनी अंत:करणात साठवला…
ती कारुण्य राणीच होती…तिने प्रेक्षकांना आसवांत भिजवलं…ती दिलकी धडकन् नव्हती …तिचं सौंदर्य,
तिचं लावण्य देवतेसारखं मनात स्थित होतं….
तिचे अनेक चित्रपट..अनेक भूमिका..!!!
यहुदी,दिल अपना औरप्रीत पराई,दिल एक मंदीर है..
बैजुबावरा,दुश्मन, अपने पराये,शारदा,साहीब बीबी और गुलाम,पाकीजा…यातली प्रत्येक भूमिका ती ओतप्रोत
जगली आणि थिएटरमधून प्रेक्षकही बाहेर पडले ते तिचा सूर आणि अश्रुंचा भार घेऊनच…तिच्या वाक्यातला एक “रे”सुद्धा ममता,काकुळती काळजी ,जवळीकता,
आशा संमीश्र भावनांनी ओथंबलेला असायचा…
प्रेक्षकांच्या ह्रदयावर स्वार झालेली ही फिल्मीस्तानची
अनभिषिक्त राणी वैयक्तिक जीवनाबाबत अपरंपार ऊदास होती..तिचे कमाल अमरोही सोबतचे तुटलेले वैवाहिक जीवन हे तर कारण होतेच.शिवाय स्वकीयांकडून मिळालेल्या उपेक्षेमुळेच ती व्यसनाधीनही झाली..तिच्या काव्यातही दर्दभरेच शब्द उमटले..
खुदाके वास्ते

गमकोभी तुम ना बहलाओ

उसे तो रहने दो मेरा

यही तो मेरा है..!!!

आयुष्यभर प्रेमासाठी भिरभिरली ..उरला फक्त एकाकीपणा…
हर नये जख्मपे अब रुह बिलख उठती है
होठ अगर हंस भी पडे,आँख छलक उठती है…!!!

३१मार्च १९७२ रोजी वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी
या चंद्रमुखीच्या अभिनयाचा आणि लावण्याचा दर्दभरा
प्रवास अनंतात विलीन झाला…
पण प्रतिभा आणि प्रतिमा अमर असतात….
आमच्या पीढीने मीनाकुमारीच्या सौंदर्यावर ,आवाजावर,
सहज सुंदर अभिनयावर मनापासून प्रेम केले ..या कारुण्यदेवतेला मनाच्या गाभार्‍यांत पुजले…
आजही,
बचपनके मुहब्बतको दिलसे ना जुदा करना
किंवा “न जाओ सैंया छुडाके …
किंवा “रुक जा रात ठहर जा रे चंदा….”
या गाण्यांचे स्वर काळीज पाझरतात….
या तारांगणात अनेक तारे चमकतात ,एक काळ गाजवतात आणि लुप्त होतात..
पण मीनाकुमारीसारखा एकमेवद्वितीय तारा कधीही विझत नाही……

सौ. राधिका भांडारकर
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा