You are currently viewing सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोखरण गावासह भजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
समीर कदम यांच्या निधनाची माहिती मिळताच माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले. तसेच समीर कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा