शिक्षक एक शिल्पकार
कवी प्रदीप जोशी, विटे
ज्ञानाचा दीप लावूनी मनी
अज्ञानाचा अंधार पळवता
संस्कारांची पेरणी करूनी
आयुष्याला आकार देता ll
पाटीवरच्या रेघांमधून
जगण्याचे मर्म शिकवले
चुकलो जेव्हा जेव्हा आम्ही
हाताला धरून सावरले ll
कधी रागावले प्रेमाने
कधी कौतुकाची थाप दिली
यशाच्या उंच शिखरावर
जाण्याची आम्हास वाट दिली ll
अक्षर-अक्षरातून घडवले
म्हणूनच आम्ही उभे राहिलो
तुमच्याच आशीर्वादाने आज
जगात ताठ मानेने चाललो ll
शत-शत प्रणाम तुम्हाला गुरुवर्य
तुमचे उपकार कधी न फिटणार
तुमच्या शिकवणीचा हा ठेवा
आयुष्यभर सोबत राहणार ll
