You are currently viewing साखरेच्या वाढत्या किमती रोखणे आवश्यक – सुभाष पाटील 

साखरेच्या वाढत्या किमती रोखणे आवश्यक – सुभाष पाटील 

(प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

साखरेच्या किमती आकाशाला भिडत आहेत. पण याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय ? असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटी सदस्य ऍड सुभाष पाटील यांनी केला आहे.

ते म्हणाले, “गेल्या महिन्याभरात किरकोळ साखरेची किंमत 42 रुपया पासून वाढत वाढत जाऊन आता ही किंमत वाढ 80 रुपया पर्यंत पोहोचली आहे. कदाचित ती सणासुदीला 100 रुपयांपर्यंत वाढणे ची शक्यता वर्तवली जात आहे. साखर कारखानदाराना अपेक्षित असलेल्या किमतीपेक्षा ही वाढ कितीतरी अधिक आहे. किरकोळ बाजारात साखर विकत घेणाऱ्या सामान्य ग्राहकांना वाटते आहे कि, ही साखरेच्या भाववाढीचा सगळा फायदा ऊसपिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच होत आहे. पण वास्तव काय आहे? ऊस पिकवणारा शेतकरी अजूनही कोरडाच आहे. त्याला साखरेच्या भाववाढीचा काहिही फायदा मिळालेला नाही. मिळेल असेही वाटत नाही. कारण संपलेल्या गळीत हंगाम मधील ऊसाची संपूर्ण एफ आर पि अजूनही एकाही कारखानदारनी आला केलेली नाही. गळीत हंगाम संपल्यानंतर 15 दिवस ते एक महिन्यात ऊसाची संपूर्ण एफ आर पि देवतेची कबुली सर्व कारखानदारांनी ऊस किमतीचा संघर्ष चालू झाले नंतर जिल्ह्यातील कलेक्टर समवेत झालेल्या बैठकीत दिली आहे. परंतु ती वचन पुर्तता कोणी ही केलेली नाही. कधी करणार यावरही कोणीच चकार शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे वाढलेल्या साखरेच्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल असे वाटत नाही. आजही असे काही कारखाने आहेत कि, त्यांनी अजूनही ऊसाचा पहिला हप्ताही शेतकऱ्यांना दिलेला नाही. वास्तविक गुजरात, तामिळनाडू सारखी राज्य जिथे ऊसाची रिकव्हरी महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी कमी असूनही ती राज्ये शेतकर्याला रु 4000/-पेक्षा अधिक रक्कम हातात देताहेत. पण महाराष्ट्रातील साखर कारखानदार मात्र याची कसलीच दखल घ्यायला तयार नाहीत. त्यानी वेळीच सावध व्हावे. आपले कोणीच काही करु शकत नाही अशा भ्रमात राहू नये. वातावरण बदलते आहे. प्रश्न विचारले जातात आणि सोडवणे भाग पाडले जातात असे घडू लागले आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असा इशारा आम्ही देत आहोत.”

प्रतिक्रिया व्यक्त करा