You are currently viewing खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते – विरेन गायकवाड

खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते – विरेन गायकवाड

शिरवल क्रिकेट लिग स्पर्धेत रवळनाथ पडवे संघ विजेता तर विनसम वागदे उपविजेता

कणकवली

शिरवल सारख्या ग्रामीण भागात स्वर्गीय शेखर शिरसाट मित्र मंडळाने “एक गाव ,एक संघ, क्रिकेट लिग स्पर्धेचे” आयोजन करून खेळाडूना क्रिकेटचे एक चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे.क्रिकेट खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते.या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात निश्चितच अनेक चांगले गुणवंत खेळाडू निर्माण होतील.असे प्रतिपादन टॅलेक्स अकॅडमी, कणकवलीचे व्यवस्थापक विरेन गायकवाड यांनी केले.ते शिरवल रतांबेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक आनंद पेडणेकर, उद्योजक शरद शिरसाट, कृष्णा कुडतरकर,दत्तात्रय प्रभू पाटकर ,सुरेश कोदे, प्रमोद नानचे, दयानंद कोदे,अनिल कुडतरकर ,प्रविण कोरगावकर, प्रमोद सावंत,चंद्रकांत कुडतरकर , प्रकाश मसुरकर,प्रशांत कुडतरकर ,महेश कुडतरकर, सूनिल कुडतरकर , मोहन कुडतरकर, अनिल शिरसाट,गुरुप्रसाद वंजारे, राजेश शिरवलकर ,आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की,खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते. असेही ते म्हणाले. स्व. स्वर्गीय शेखर शिरसाट हे व्यक्तिमत्त्व परोपकारी वृत्तीचे व्यक्तीमत्व होते.कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक , राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.आणि हाच त्यांचा
वारसा अशा‌ विविध उपक्रमातून
स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळ जोपासत आहेत.मंडळाचे हे उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार गायकवाड यांनी काढले.

यावेळी स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या रवळनाथ पडवे संघाला रोख रक्कम दहा हजार एक रुपये आणि आकर्षक ‌चषक देऊन आनंद पेडणेकर आणि शरद शिरसाट यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपविजेता – विनसम वागदे – संघाला ७००१ रुपये आणि आकर्षक चषक दत्तात्रय प्रभुपाटकर आणि दयानंद कोदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक – सनराईज हळवल संघाला ,विरेन गायकवाड यांच्या हस्ते आकर्षक चषक मालिकावीर – श्रीधर सावंत (पडवे) याला,सुरेश कोदे
उत्कृष्ट फलंदाज – अमित पडवेकर (पडवे) याला प्रमोद नानचे
उत्कृष्ट गोलंदाज – गिरीश परब (वागदे)याला अनिल कुडतरकर
उगवता खेळाडू – सुरज रावत (पडवे) याला प्रमोद सावंत सहभागी संघ – सन्मानचिन्ह -प्रशांत कुडतरकर यांच्या सौजन्याने तर,विरेन गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी सैनिक आनंद पेडणेकर म्हणाले कि,. क्रिकेट खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते तसेच खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते.असे पेडणेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार सुनिल कुडतरकर यांनी मानले.क्रिकेट स्पर्धेचे धावते समालोचन समालोचक विलास गोलतकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.

फोटो: स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळ शिरवल आयोजित क्रिकेट लीग स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या रवळनाथ पडवे संघाला गौरविताना शरद शिरसाट आणि आनंद पेडणेकर,सोबत मंडळाचे पदाधिकारी आदी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + nine =