You are currently viewing कुडाळ सिंधुदुर्गच्या राजाची नियोजनाची बैठक संपन्न

कुडाळ सिंधुदुर्गच्या राजाची नियोजनाची बैठक संपन्न

 

२९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता पिंगुळी इथून सिंधुदुर्ग राजा सभा मंडपात होणार आगमन

कुडाळ येथे दिनांक २३ रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून स्थापन होणारा प्रतिवर्षी “सिंधुदुर्गचा राजा” गणेश उत्सवानिमित्त कुडाळ भाजपच्या कार्यालयात नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित विनायक राणे, आनंद शिरवलकर, बंड्या सावंत, राकेश कांदे, राकेश नेमळेकर, गणेश भोगटे, निलेश परब, राजवीर पाटील, आदिती सावंत, विनायक घाडी, आदी उपस्थित होते.

कुडाळ येथील सभामंडपात सोमवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग राजाची मूर्ती वाजत गाजत दाखल होणार आहे. सकाळी १० वाजता पिंगुळी माडये गणेशमूर्ती केंद्र येथून आणण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी दिवशी सकाळी ठीक १० वाजता विधिवत पूजन करण्यात येणार आहे.
तसेच गणेश उत्सव कालावधीत डबलबारी, दशावतारी नाटक, फुगडी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच अनेक सर्व मंडळे, संस्था, शासकीय कार्यालय यांच्या प्रतिनिधींना महाआरतीवेळी सहभागी करून घेण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच नऊव्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी महाप्रसाद यांचे आयोजन केलेले आहे. तरी असंख्य गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा, आणि असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा