You are currently viewing संत सावता माळी

संत सावता माळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संत सावता माळी* 

 

पडवळ मिरची कोथंबीरी

माळव्याची फुलली पंढरी

उभ्या रानात दिसतो

सावत्याचा विठ्ठल हरी

 

पाटाच्या पाण्यात उभा

पंढरीचा वारकरी

बारे देई शेतावर

सावळा विठ्ठल हरी

 

मळा हिचं पंढरी

भाजीपाला वारकरी

एकेक झाडासंगे

बोले सावता श्रीहरी

 

सुगंध फुले पुष्पांजली

विठ्ठलाच्या पायावरी

घेवुन येई सावता भक्त

पुजा मळ्यातच करी

 

नाही गेला पंढरीला

त्याचा विठ्ठल अंतरात

मुलामाणसात पाहे

सावता पंढरीनाथ

 

भक्त तल्लीन जाहला

विळ्या खुरप्याच्या संग

रानपाखरासवे गाई

सावता होवुनिया दंग

 

भाजीपाल्यात दिसतो

सावत्याशी विठुराया

भक्त एकमेव त्याचा

पाठीशी असे छाया

 

कष्ट करीता दिनरात

सावत्याने सजविला मळा

हिरव्यागार रानामध्ये

विठ्ठल डोळा देखियला

 

भक्त आवडे सावता

पंढरीनाथाशी फार

त्याच्या अंतरात नांदे

विठुरायाचा संचार

 

भक्त पांडुरंगाचा

असा होवुनिया गेला

देह आयुष्याचा त्याने

विठ्ठल सेवेसी अर्पिला

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा