*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पंढरीच्या नाथा..*
पंढरीच्या नाथा अरे भगवंता
जगाचा नियंता, पांडुरंग…
दिले खूप देवा तरी नाही सेवा
हवा फक्त मेवा, असेकसे..
तुच दिली बुद्धी आणि ऋिद्धीसिद्धी
तरी का उपाधी, सांग देवा..
अनाचार किती तुला दिसतात
तरी बासनात, ठेविशी का..,
ठरलेले सारे, असे तू म्हणतो
जीव टांगणीला, लागतोच..
उघड ना डोळा फक्त एकदाच
त्रिनेत्राने जाळ, दुषित जे..
सुखशांती देई जगतास साऱ्या
पंढरीच्या वाऱ्या चालतात..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
