अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धारणातील पाणीपातळी भरली
पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रात उतरु नये
सिंधुदुर्गनगरी
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणीपातळी 159.10 पातळी पर्यंत भरली असून कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन अरुणा नदीत चालू होणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्र बाहेरील नदीमध्ये पाणी पातळी वाढणार आहे.
तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येतो की, 4 जुलै पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी केव्हाही वाढण्याची शक्यता असल्याने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी,असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उप कार्यकारी अभियंता रुपेश चव्हाण यांनी केले आहे.
