You are currently viewing सावंतवाडीतील श्री रासाई युवा कला-क्रीडा मंडळाची संविताश्रमाला मदत…

सावंतवाडीतील श्री रासाई युवा कला-क्रीडा मंडळाची संविताश्रमाला मदत…

सावंतवाडी

येथील श्री रासाई युवा कला-क्रीडा मंडळाच्या वतीने पणदूर येथील संविताश्रमाला जीवनावश्‍यक वस्तूंची मदत देण्यात आली. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरम्यान या उत्सवाला भाविकांकडून देण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तू आश्रमातील निराधारांसाठी देण्यात आल्या.
मंडळाच्यावतीने गेली दहा वर्ष हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी कोरोना काळात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान या उत्सवाला दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांकडून कडधान्य, नारळ, तेल, तांदूळ असे जीवन आवश्यक साहित्य मंडळाकडे देण्यात आले होते. हे साहित्य निराधारांना मदत म्हणून आश्रमाचे कार्यवाहक संदीप परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली
यावेळी मंडळाचे खजिनदार लखन पाटील, सचिव कृष्णा लाखे, कार्याध्यक्ष मनोज लाखे, सुभाष लाखे, रोहित लाखे, गोपी पाटिल, अविनाश पाटिल, राम लाखे, आदर्श पाटील, रोहन पाटिल, गणेश पाटील, महेश लाखे, बाबु लाखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 9 =