एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार…

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार…

– राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे.

खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय.

खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सांगितलं आहे.

मीडियाशी बोलताना मी भाजपचा राजीनामा देणार आहे,’ असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा