You are currently viewing आम्ही बालकवी सिंधुदुर्गच्या वक्तृत्व स्पर्धेत बांद्यातील मायलेकाचे यश

आम्ही बालकवी सिंधुदुर्गच्या वक्तृत्व स्पर्धेत बांद्यातील मायलेकाचे यश

बांदा
‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ चा विद्यार्थी नैतिक निलेश मोरजकर व खुल्या गटात व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका रिना निलेश मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. राज्यस्तरीय स्पर्धेत माय-लेकाने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर शाळा बंद आहेत. या कालावधीत मुलांच्या वक्तृत्व शैलीला वाव देण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येत आहेत. विद्यार्थी व पालक यांचा देखील या स्पर्धांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही बालकवी या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांना राज्यभरातून दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात नैतिक मोरजकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. नैतिकने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील पराक्रमाची गाथा सादर केली होती. खुल्या गटात रिना मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सौ रिना यांनी ‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ यावर वक्तृत्व सादर केले होते.
लॉकडाऊन कालावधीत माय-लेकाने विविध जिल्हास्तरीय, शाळास्तर व राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्यांच्या यशाबद्दल बांदा शहरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =