You are currently viewing सौ रजनी चौधरी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सौ रजनी चौधरी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

अमरावती :

सौ रजनी चौधरी यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसून येते. सामाजिक भान असलेल्या या कवयित्रीला पुढील काळात उज्ज्वल भवितव्य आहे असे उद्गार सुप्रसिद्ध समाजसेविका व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांच्या मातोश्री श्रीमती शारदा इटनकर यांनी अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये काढले. सौ रजनी गुणवंत चौधरी यांच्या अनुभव या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका व विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीच्या सदस्या प्राचार्य डॉ.शोभा रोकडे गुणवंत चौधरी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण विधळे सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेश चंद्र काठोळे सिकची रिसॉर्टचे संचालक श्री सचिन माळकर मिशन आयएएसच्या कोषाध्यक्ष सौ विद्या घाटे मिशनचे नंदुरबारचे विभागीय संचालक श्री शांतीलाल महाजन सुप्रसिद्ध वक्ते श्री एजाज शेख जळगाव मिशन आयएएसचे सदस्य व लातूरचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री संतोष स्वामी प्रा. रेखा विधळे हे विचार पिठावर उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. प्रियंका चौधरी यांच्या प्रास्ताविकाने झाली. श्री सचिन माळकर यांनी प्रेमकिशोर सिकची वलगाव या ट्रस्टचा परिचय उपस्थितांना करून दिला. तर प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी सौ रजनी चौधरी यांचा परिचय करून दिला. कुमारी स्वधा येरुळकर उन्नती काठोळे आकाश सारवे ईश्वरी भालचक्र मुनिराज कुथे संजय काशीवार शंकर पत्रे वैष्णव चौधरी व डॉ. हेमंत उर्फ बाळूभाऊ देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्वस्वी प्रा. प्रवीण विधळे प्रा. डॉ शोभा रोकडे यांचे अनुभव या कवितासंग्रहाचे विश्लेषण करणारे मनोगत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी सौ रजनी चौधरी यांचा या तिन्ही संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ रजनी चौधरी यांनी आपल्या भावनातून आपल्या कवितांची उकल कशी कशी होत गेली याचे चित्रण केले. याप्रसंगी सर्वश्री डॉ. वैष्णवी चौधरी राजीव बोबडे मधुसूदन व मनीषा माळोदे सुविद्या ठाकरे व डॉ. सुनील कडू यांनी सौ रजनी चौधरी यांचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता श्री कौस्तुभ चौधरी यांच्या आभार प्रदर्शन यांनी झाली. कार्यक्रमाला सौ रजनी चौधरी यांचा चाहता वर्ग व स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरातील सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी सौ रजनी चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पुढील वर्षापासून दोन उकृष्ट विद्यार्थ्यांना विभागून पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा