You are currently viewing पती पत्नी मधला द्वैतभाव संपावा… अहेरराव

पती पत्नी मधला द्वैतभाव संपावा… अहेरराव

पती पत्नी मधला द्वैतभाव संपावा… अहेरराव

पिंपरी

कवयित्री रेणुका हजारे यांच्या मुलाच्या विवाहप्रीत्यर्थ झालेल्या स्वागत समारंभात नव दाम्पत्य चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. रूपाली यांच्या हस्ते ‘स्पर्शाविना तुझ्या’ या चारोळीसंग्रहाचे
पुस्तक प्रकाशन करण्यात आले. त्या प्रसंगी राज अहेरराव बोलत होते.
बर्ड व्हॅली येथील रॉयल बँक्वेट हॉलमधे हा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.
राज अहेरराव पुढे म्हणाले, ‘पती पत्नी यांनी फक्त पती पत्नी न राहता मित्र म्हणून, प्रियकर म्हणून पण राहावे तरच जीवनाचे सोने होते. पती पत्नी यांनी एकमेकाना बघताना पत्नीने पतीमध्ये आणि पतीने पत्नीमध्ये ईश्वरत्व शोधावे आणि अद्वैतभाव जोपासावा!’
या प्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, टाटा मोटर्स कामगार नेते महेंद्र कदम, टाटा मोटर्स कलासागर साहित्य विभाग माजी सचिव सुधीर सहबनीस, माजी उपमहापौर केशव घोळवे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन राजेश हजारे मित्रपरिवार यांनी केले.
सूत्रसंचालन राजाराम सावंत
यांनी तर आभार राजेश हजारे यांनी केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा