You are currently viewing पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचा युवराज लखामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार

पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचा युवराज लखामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार

पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचा युवराज लखामराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार…

सावंतवाडी

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालय आरोसच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर _गोडकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखामराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जात त्यांचा सत्कार केला .

यावेळी त्यांच्यासमवेत पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप भारमल, सेवानिवृत्त प्रा. दिलीप गोडकर, डॉ. हिरामणी , डॉ.शिंत्रे, डॉ. पाटील, प्राध्यापक सोनाळकर उपस्थित होते. सौ. मांजरेकर या पंचम खेमराज च्या माजी विध्यार्थी आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे संस्थांनचा सन्मान आहे. काळानुरूप अपडेट राहून त्यानी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. इतर शिक्षकांनीही त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यानी केले.सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर या विद्याविहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे सहाय्यक शिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत.21 वर्षे मराठी व हिंदी विषयांचे अध्यापन.हिंदी मराठी व अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एम.ए पदवी संपादन केली. तसेच शालेय व्यवस्थापन पदवी त्यांनी संपादन केली असून एम. एड. पदवीचा त्यांच्या अभ्यासही सुरु आहे. कोकण बोर्ड मॉडरेटर म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या ‘ अंधायुग ‘ या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. व उपाययोजना या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षण व उपाय योजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. कोरोना काळातील ऑनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्याच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यापनाचे व्हिडिओ ही यू ट्युब वर आहेत. कोरोना महामारी काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सौ मांजरेकर यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.

*संवाद मीडिया*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*आता बांद्यात…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा