You are currently viewing लोणंद च्या सुपुत्राकडून देशाला अनोखी सलामी…

लोणंद च्या सुपुत्राकडून देशाला अनोखी सलामी…

मालवणच्या समुद्रात रेखाटलीभारताच्या तिरंग्याची छबी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य

मालवण :

लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पदक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी बीच समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने अंदाजे ४०० फुट लांब निसर्गपूरक खाद्य व रंग वापरुन भारताचा तिरंगा बनवूण अनोखी सलामी दिली. यापूर्वीही प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ३२१ फुटाची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर ३५० फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महीन्यापूर्वी कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता.मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये मागील याच महिन्यांमध्ये ३२१ फूट तिरंगा फडकविला होता. प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अॅडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वन रकक्ष विश्वास मीसाळ, राहुल परदेशी व मालवन येथील अन्वय अंडरवॉटर सर्विसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी तीन बोटी द्वारे सुमारे तीन किलोमिटर आत समुद्रामध्ये गेल्यानंतर मालवण येथील दांडी बीच समुद्रामध्ये सुमारे ४०० फुट लांब तिरंगा निसर्गापुरक कलर व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दीनानीमीत्त एक आगळी वेगळी सलामी देन्यात आली. ज्या पध्दतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धुर सोडुन हवेत तीरंगा निर्माण करून सलामी देतात याच पध्दतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली. कोणत्याही देशाचा ४०० फुट लांब एवढा मोठा तीरंगा पाण्यामध्ये तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमुन गेला होता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − two =