नितेश राणे यांच्या हस्ते पूजन; इंधन बचत व प्रदूषण कमी करण्यास मदत
सिंधुदुर्गनगरी :
पर्यावरणपूरक प्रशासनाच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल टाकत पहिल्याच ई-व्ही (इलेक्ट्रिक) कारचा समावेश केला आहे. या वाहनाचे पूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.
पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असून, या उपक्रमामुळे इंधन बचतीसह प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘हरित प्रशासन’ ही संकल्पना अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
