चिखली (बबनराव आराख) :
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती स्थानिक राजर्षी शाहू महाराज सभागृह प.स. चिखली येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी शाहीर मनोहर पवार काव्यांजली वाहातांना आपल्या प्रस्तावनेत म्हणाले की महात्मा फुलेंचे कार्य महान असून त्यांनी त्याकाळच्या व्यवस्थेला डोळ्यात डोळे घालून आव्हान दिले.
महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सदर अभिवादन तथा काव्य संमेलन आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्य क्रमाचे आयोजक संजय वाकोडे यांनी तसेच मानवर रफिक शेठ कुरेशी, बंडू कुळकर्णी आणि मान्यवर यांनी प्रथम क्रांतीसुर्य महात्मा फुले याच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व अभिवादन करण्यात आले. विनोद खंडागळे, रफिक शेठ, कवी नंदी प्रशांत पाटील डॉ., निवृत्ती जाधव, कवी संजय हिवाळे, कुटे सर, कवी / शायर महेश वाधवाणी शिंदे सर यांनी आपल्या काव्य रचना सादर केल्यात. शाहिर कवी मनोहर पवार यांनी सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची महती वर्णन करणारी काव्य रचना आपल्या शाहिरी आवाजात सादर केली.
भिडे वाड्यात / वाड्यात
भरली पहिली शाळा ।
कसा फुलविला / फुलविला ।शिक्षणाचा मळा ॥
आदी अनेक काव्य कडवे सादर केले. यावेळी इतर कविंनीही आपल्या रचना सादर केल्या. महात्मा फुले यांना शब्दातून काव्यातून अभिवादन केले.
अध्यक्ष स्थानिक मा.नगरसेवक बंडू कुळकर्णी हजर होते. सुत्रसंचालन संजय वाकोडे यांनी केले तर आभार खंडागळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील बहूसंख्य फुले प्रेमी महिला पुरुष हजर होते.
