नागरिकांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात

नागरिकांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात

नागरिकांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला बिनबोभाट सुरुवात : राष्ट्रवादीचा आरोप

कणकवली / प्रतिनिधी :-

कणकवलीकर नागरिकांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करत कणकवलीतील रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला बिनबोभाटपणे सुरुवात करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांनी केला आहे.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनी ने पुन्हा सुरुवात केली आहे. गांगो मंदिर ते शासकीय विश्रामगृहात पर्यंत उड्डाणपूल होत आहे.

कणकवली महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर रुंदीकरण तसेच निकृष्ट दर्जाचे काम उघड झाले होते याबाबत येथील जनतेने अनेक प्रश्न उपस्थित केले होते.या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्रीमहोदयांनी आश्वासने दिली होती त्याचे काय झाले असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांनी विचारला आहे.आता कणकवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून उड्डाणपुलाचे काम मात्र जलद गतीने सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी या उड्डाणपुलामुळे नक्कीच कमी होणार आहे, मात्र एस. एम. हायस्कूल येथील घडलेली घटना तसेच शहरातील शिवाजी पुतळ्याकडील उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग लक्षात घेता होणारे निकृष्ट दर्जाचे काम सर्वांसमोर आले असल्याने कणकवलीतील नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते,मात्र या प्रश्नांचे पुढे काय झाले असा प्रश्‍न उपस्थित करत रुपेश जाधव यांनी या निकृष्ट कामाची आधी चौकशी करा नंतरच पुलाचे काम पूर्ण करा असे मत व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा