You are currently viewing क्रिकेट स्पर्धा, दशावतारी नाटकांच्या आड भरतात जुगाराच्या मैफिली

क्रिकेट स्पर्धा, दशावतारी नाटकांच्या आड भरतात जुगाराच्या मैफिली

सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये क्रिकेट स्पर्धा आणि दशावतारी नाटकांच्या आडून जुगाराच्या बैठका भरवल्या जातात. तरुण वर्ग हा क्रिकेट वेडा आहे, आणि अलीकडे अंडर आर्म सारखे झटपट क्रिकेटचे प्रकार जास्त खेळवले जातात ज्यात कमी वेळेत सामने संपतात आणि बक्षीस जास्त मिळते.त्यामुळे तरुण वर्ग क्रिकेटकडे आकर्षित झाला आहे. सावंतवाडीतील काही अवैध दारू व्यवसायात आघाडीवर असणारे तरुण क्रिकेटचे संघ घेऊन तालुक्यातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे तरुण वर्ग अवैध व्यवसायांमध्ये गुंतत चालला आहे. स्थानिक खाकीला हाताशी धरून क्रिकेट सारख्या स्पर्धा व दशावतारी नाटके आयोजित करून त्यांच्या आडून जुगाराच्या बैठका बसविल्या जातात. आणि अशा स्पर्धांच्या ठिकाणी बसणाऱ्या जुगाराच्या बैठकांमध्ये तरुण वर्ग ओढला जात आहे आणि व्यसनी बनत चालला आहे.
सावंतवाडी जवळील कोलगाव येथे महाभारत सांगणाऱ्या *संचय* नावाच्या “प” मध्ये वार करणारी व्यक्ती जुगाराची मोठी मैफिल बोलावतो…”आजू” नावाचा त्याचा उजवा हात पट मारतो. जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी कोलगाव येथील “प” मध्ये वार करणाऱ्या “संचय” च्या जुगाराच्या मैफिलीत हजेरी लावतात.
स्थानिक खाकी वर्दीशी संगनमत करून कोलगाव येथे बैठक बसते. जिल्हा पोलीस अधीक्षक स्थानिक खाकीच्या करामतींपासून अनभिज्ञ आहेत. ग्रामीण भागातील जागरूक नागरिक स्वतः फोन करून संवाद मिडीयाला माहिती देतात. संवाद मीडिया नेहमीच अवैद्य धंद्यांच्या विरोधात आवाज उठवीत असल्याने विश्वासाने ग्रामीण भागातील लोक अवैध धंद्यांची माहिती देत असतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोलगाव येथे चालणाऱ्या जुगाराच्या मैफिलीची योग्य ती दखल घ्यावी अशी कोलगावातील स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा