You are currently viewing विजयदुर्ग रोडवर बिबट्याने केला युवकावर जीवघेणा हल्ला

विजयदुर्ग रोडवर बिबट्याने केला युवकावर जीवघेणा हल्ला

देवगड

विजयदुर्ग रोड वरील पत्रा दुकान स्टॉप वर मंगेश बाणे या 35 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला आहे पायावर जोरदार पंजा मारल्याने तो जखमी झाला आहे त्याला पडेल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले

ही घटना 17 एप्रिल रोजी आठच्या सुमारास घडली मंगेश बाणे हा पडेल खालची वठार वाडी या भागात राहतो

नेहमीप्रमाणे तो घरी जात होता मात्र पत्रा दुकान या स्टॉप जवळ तीन बिबटे त्याच्या मोटरसायकल जवळ आडवे आले व त्यातील एका बिबट्याने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे हे बिबटे वारंवार लोकांना दिसत असून त्यांची दखल वनविभागाने घेऊन तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा