You are currently viewing मालवण भुयारी गटार योजना व सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प

मालवण भुयारी गटार योजना व सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले चौकशीचे आदेश

विजय केनवडेकर यांनी वेधले होते लक्ष

मालवण भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील ठेकेदाराचा कामाची चौकशी करून काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केली होती. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत.
भुयारी गटाराला अतिरिक्त निधी देऊन योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा .
केंद्र शासनाकडील UIDSSMT योजनेतून मालवण नगर परिषदेच्या भुयारी गटार योजना व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तेरा वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकला नाही . यासंबंधी मालवण शहराला आवश्यक असणारी ही भूयारी गटार योजना होणे आवश्यक आहे . या उद्देशाने 26 ऑगस्ट 2009 ला कार्यारंभ झालेली योजना अजूनही पूर्ण होऊ शकत नाही. या कामांमध्ये ठेकेदाराकडून होणारी दिरगाई कामाचं नसणारे नियोजन यामुळेच योजना मार्गस्थ होत नाही.प्रकल्पाच्या 85% रक्कम अदा करूनही ठेकेदार काम करू शकला नाही .या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय चौकशी न होता याच्यावर काम विलंबासाठी दंडात्मक कारवाई एकदाही झालेली नाही . श्री. व्ही. आर. घुगे. औरगाबाद यांचा कडे कंत्राट असताना सब कंत्राटदार म्हणून श्री .उत्तरवार काम पहात आहेत. सब कंत्राटदारा मुळेचे या कामाचा पुर्ण सत्यानाश झाला आहे.हा ठेकेदार पूर्णपणे आर्थिक अडचणीत असून सर्व बँकांमध्ये थकीत आहे.त्यामुळे पुढील काम या ठेकेदाराकडून होणे शक्य नाही.तसेच या योजनेमार्फतच 32 वेळा कामासाठी बिल दिले असून यंत्रसामुग्री आणण्यासाठी दोन कोटी निधी या ठेकेदारास दिलेला होता . या ठेकेदाराने नगरपालिकेच्या सभेमध्ये आपण साहित्याची ऑर्डर दिली असून त्या संबंधित असणारे कागद सभागृहाला दाखवले होते .तीन वर्ष होऊनही एकही यंत्रसामुग्री नगरपालिकेकडे उपलब्ध झालेली नाही. यासंबंधी प्रशासनाने याला स्मरणपत्र दिले असता यासंबंधी कोणतेही उत्तर न देता वाढीव निधी उपलब्ध करून द्या तरच मी काम करू शकतो अशी अट घालून अरेरावीची भाषा करताना दिसत आहे. STP-3 MLD चे प्रलंबीत पैसे घेऊन ठेका सोडण्याचा मनस्थितीत ठेकेदार आहे. असे झाल्यास ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात जनयाचिका भाजपा मार्फेत दाखल करणार आहे.या ठेकेदाराकडून हा प्रकल्प पूर्ण होणार नसून याचे पुनर्लोकन करून उर्वरित कामाचे नवीन निविदा काढावी व या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. पूर्ण कामाचे ऑडिट झाल्याशिवाय मालवण नगरपालिकेकडे असणारे अनामत रक्कम देण्यात येऊ नये .अशी मागणी मा.रवींद्र चव्हाण पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्याकडे भाजपा तर्फ करण्यात आली होती .
तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक चार कोटी चा निधी लवकरात लवकर मालवण नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे .2009 च्या प्रकल्प अहवाला प्रमाणे कोणताही ठेकेदार काम करण्यास तयार होणार नसून यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा व मागील ठेकेदाराचा पूर्णपणे चौकशी करावी. उर्वरित कामाची नविन निविदा तयार करण्यात यावीअशी विनंतीही विजय केनवडेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =