You are currently viewing आंदुर्ले गावचे पखवाज अलंकार महेश सावंत महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड २०२१या पुरस्काराने सन्मानित

आंदुर्ले गावचे पखवाज अलंकार महेश सावंत महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड २०२१या पुरस्काराने सन्मानित

विणा इंटरनॅशनल पब्लिकेशन कोल्हापूर आणि जिव्हाळा कलामंच यवतमाळ तर्फे कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संमेलनामध्ये दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापूर, शाहू स्मारक येथे सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावचे पखवाज अलंकार तसेच ज्यांनी आताच पखवाज आणि कथक नृत्य कलाविष्कार रेकॉर्डब्रेक कला सादर करून आशिया पेसिफिक रेकॉर्डस् बुक मध्ये आपल्यासह अनेक पखवाज वादक आणि कथक नृत्यांगनाचे नाव जगाच्या इतिहासात कोरले असे श्रीमान महेश विठ्ठल सावंत यांना प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मा. डॉ.समीरा गुजर (जोशी) यांच्या हस्ते त्यांच्या या सांगीतिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशाबद्दल सावंत म्हणाले की आपल्या या पुरस्काराचे श्रेय गुरुवर्य डॉ.श्री दादा परब, श्री भालचंद्र केळुसकर बुवा तसेच आपली  आई, कै.वडिल, कै.आजोबा आणि संगीत कलेतील सर्व गुरुतुल्य व्यक्ती आणि सर्व मित्रपरिवार, हितचिंतक आपला सर्व विद्यार्थिवर्ग आंदुर्ले गावचे ग्रामस्थ याना जाते आहे असे सांगून संगीत कलेची अविरत आजन्म सेवा करण्याचा मानस असल्याचा सांगितले, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

श्रीमान महेश विठ्ठल सावंत

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + thirteen =