You are currently viewing वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

१३ पैकी ९ ग्रामपंचायत भाजपकडे तर ४ ग्रामपंचायत सेनेकडे…

वैभववाडी

शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे तालुक्यात वर्चस्व राहिले आहे. १३ ग्रा. पं.पैकी ९ ग्रा. पं. भाजपने काबीज केल्या आहेत. तर ४ ग्रा. पं. वर सेनेने झेंडा फडकाविला आहे.
तालुक्यातील सांगुळवाडी, आचिर्णे, मांगवली, वेंगसर, एडगाव, नाधवडे, कोकिसरे, ऐनारी, भुईबावडा या नऊ ग्रा.पं. वर भाजपची सत्ता आली आहे. तर लोरे, खांबाळे, कुंभवडे, खांबाळे, सोनाळी ग्रा. पं. वर सेनेने भगवा फडकाविला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा