You are currently viewing आज वैभववाडी – कोकिसरे येथे महायुतीची सभा 

आज वैभववाडी – कोकिसरे येथे महायुतीची सभा 

केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन

 

वैभववाडी :

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकिसरे येथे महायुतीची सभा आज सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. ही सभा माधवराव पवार विद्यालय येथे होणार आहे.

या मेळाव्याला केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणेसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सुपर वारियर्स, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा