सावंतवाडीत शिवसेनेकडून अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन…

सावंतवाडीत शिवसेनेकडून अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन…

घरातून बाहेर काढून चोप देऊ असा इशारा

शिवसेना महिला तालुका संघटक सौ.अपर्णा कोठावळे

सावंतवाडी प्रतिनिधी
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसावर केलेल्या आरोपाविरोधात निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करून तिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज सावंतवाडीत दहन करण्यात आले

कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांचा केलेला अपमान आणि मुंबई ची पाकव्याप्त काश्मीर शी केलेली तुलना ही निषेधार्ह असून यापुढे असं व्यक्तव्य केल्यास शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व महिला मुंबईत दाखल होऊन घरातून बाहेर काढून चोप देऊ असा इशारा महिला संघटक सौ.अपर्णा कोठावळे दिला आहे.

यावेळी नगरसेविका सौ भारती मोरे, नगरसेविका सौ शुभांगी सुकी, नगरसेविका सौ रुपाली सावंत, चित्रा धुरी, श्रुतिका दळवी, गीता सुकी, प्रगती बामणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा