You are currently viewing आंगणेवाडी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडीचा प्रथम क्रमांक

आंगणेवाडी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडीचा प्रथम क्रमांक

मालवण :

 

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिराच्या सुवर्णकलश स्थापना वर्धापन दिनानिमित्त आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये रेडी येथील समर्थ गवंडीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक विभागून नंदिनी बिले सावंतवाडी आणि प्रेयश पवार कणकवली यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक मृणाल सावंत (पिंगुळी) नेहा जाधव (इन्सुली ) यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ निधी खडपकर (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना काका आंगणे म्हणाले, स्थानिक मुलांना तसेच जिल्ह्यातील गुणवंत मुलांना नृत्याच्या माध्यमातून कलेचे दालन खुले व्हावे. या सर्वांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा म्हणून आंगणे कुटुंबीयांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यापुढेही विविध स्तरातील जिल्ह्यातील मुलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आंगणेवाडीत घेतल्या जातील.

स्पर्धेचे परीक्षण श्री सिद्धेश पालव आणि चेतन हडकर यांनी केले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बक्षिस वितरण प्रसंगी आंगणेवाडी नाट्य मंडळाचे अर्जुन उर्फ काका आंगणे, सुनील आंगणे, दिनेश आंगणे,समीर आंगणे, पपू आंगणे,बाबू आंगणे,विद्या आंगणे, नंदू आंगणे,सतीश आंगणे, पंकज आंगणे, संतोष आंगणे, गणेश आंगणे, अनिल पालव, सुधा आंगणे,सचिन आंगणे,तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, विनोद आंगणे, अक्षय आंगणे, संजय आंगणे, संतोष आंगणे, प्रथमेश आंगणे, पंकज आंगणे, निशिकांत आंगणे,शशी आंगणे, बाळा आंगणे, दिनेश आंगणे, संकेत आंगणे, देवेंद्र आंगणे, कुणाल आंगणे, जयवंत आंगणे, अमोल आंगणे, प्रतीक आंगणे, महेश आंगणे, प्रसाद आंगणे, समीर आंगणे, सागर आंगणे,विनायक आंगणे, प्रकाश आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा