You are currently viewing लेकींना

लेकींना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लेकींना*

 

गझल : वृत्त : पादाकुलक :

 

घरात जोवर वाजे कंकण

तोवर गजबजलेले अंगण

 

निघून गेली तिच्या घराला

शांत शांत मग झाले पैंजण

 

हिरमुसलेली चूल बोळकी

सागरगोटे , इवले दर्पण

 

मुकेपणाने जो तो वागे

कुठे हरवले सारे घरपण

 

माहेराला मुकल्या त्यांना

गझल आजची करतो अर्पण

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा