You are currently viewing ओरोस नाक्यावर गोल्डनमॅनचा खुलेआम मटका

ओरोस नाक्यावर गोल्डनमॅनचा खुलेआम मटका

हाकेच्या अंतरावरील जिल्हा पोलिस अधीक्षकांना आव्हान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटक्याचे धंदे खुलेआम होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती, काही राजकीय नेते राजकारणाच्या आडून मटक्याच्या व्यवसायात उतरले आहेत. खाकी वर्दीशी संगनमत करून महिन्याचा हफ्ता ठरवून मटका म्हणजे जणू काय एखादी मोठी इंडस्ट्री बनली आहे. असाच एक शक्ती कपूर परत बाईक वीस वर्षांपूर्वी दोडामार्ग येथून धंद्याच्या शोधात ओरोस येथे आला. ओरोस येथे त्याने मटका बिटर म्हणून व्यवसायास सुरुवात केली. मटक्याच्या अवैध धंद्यात ओरोसमध्ये त्याने अफाट संपत्ती गोळा केली. जिल्ह्याच्या राजधानीच्या ठिकाणी दहा गुंठे जागा घेत घर बांधले आणि लोकांना मटक्याच्या व्यवसायात ओढून ऐशआरमाचे जीवन जगत आहे.
दोडामार्ग येथून येऊन ओरोसमध्ये मटक्याच्या जीवावर जम बसवलेल्या परत बाईक या गोल्डन मॅनने ओरोस नाक्यावर पत्र्याची शेड घेऊन खुलेआम मटका व्यवसाय सुरू केला आहे. त्याची मुले देखील मटक्याच्याच व्यवसायात आपले करियर करत आहेत. गॉगल लावून शक्ती कपूर स्टाईल मध्ये लाल रंगाच्या पल्सर गाडीवर फिरणाऱ्या परत बाईक च्या अंगावर जवळपास दीड किलो सोने आहे. सोन्याचा शौकीन असलेल्या परत बाईक ने ही एवढी संपत्ती जमवली कशी असा प्रश्न पोलिसांना देखील पडत नाही. लाल रंगाचा पल्सर वर हा गोल्डन मॅन ओरोस रुग्णालयासमोर जाऊन मटका घेतो. रुग्णांसोबत रुग्णालयात आलेले काही नातेवाईक देखील त्याच्याकडे मटका घेतात. परत बाईक मटका स्वीकारताना मात्र स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना त्याच्या कृत्यासमोर मान खाली घालावी लागते. परंतु कोणीही राजकीय नेता, कार्यकर्ता अथवा पोलीस प्रशासन त्याच्या विरोधात कारवाई करत नाहीत हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.
अलिकडेच राजकारणापासून काही काळ दूर असलेला माजी राजकीय नेता परत बाईकच्या मागे लागला आहे. परत बाईक या गोल्डन मॅन चा सुरू असलेला हा कारनामा, त्याची मटक्याच्या अवैध व्यवसायाची पत्र्याची शेड ही ओरोस जिल्हा पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही पोलिस प्रशासन,जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या होणारा दुर्लक्ष मात्र ना समजणारे कोडे बनले आहे. त्यामुळे ओरोसमध्ये गोल्डन मॅन परत बाईक याच्या अवैध मटका व्यवसायावर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून कारवाई होणार की हम भी साथ साथ असाच मटका व्यवसाय सुरूच राहणार अशी कुजबुज ओरोस वासीयांमध्ये सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =