You are currently viewing प्रशासनाकडून तारकर्ली दुर्घटनेची गंभीर दखल; आजपासून अनधिकृत बोटींवर कारवाई

प्रशासनाकडून तारकर्ली दुर्घटनेची गंभीर दखल; आजपासून अनधिकृत बोटींवर कारवाई

मालवण :

तालुक्यातील तारकर्ली बोट दुर्घटनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दाखल घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत तब्बल २० पर्यटक होते. तसेच एकाही पर्यटकाला लाईफ जॅकेट देण्यात आली नव्हती अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी दिली. पर्यटन व्यवसायातील अनधिकृत बोटींवर आणि लाईफ जॅकेट न वापरणाऱ्यांवर  कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायविंग उलटल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात नागरिकांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मदत कार्यासाठी गर्दी केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =