*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य भावकवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनीची सांत्वना*
****************
भोग भोगिले सारे सारे
सरल्या साऱ्या संवेदना…..
बंद पापणीत जन्म सारा
उसवितो मी आठवणींना…..
उरि सोहळे सुखदुःखांचे
व्याकुळ अंतरी पाहताना…..
बंध , रेशमी प्रीतभावनांचे
छळतेच वास्तव जगताना…..
आज झाले गेले संपले सारे
काय कसे शोधावे ते कळेना…..
उकलेलही सत्य हे कधीतरी
हीच एक मनीचीच सांत्वना…..
ऋणानुबंध हेच गतजन्मांचे
आता तरी कुणा कां कळेनां,….
***********************
*©️वि.ग. सातपुते.(भावकवी )*
*📞(9766544908)*