You are currently viewing शेजारी

शेजारी

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शेजारी*

 

आम्ही शेजारी शेजारी

शेजार धर्म पाळतो

सुखात आणि दु:खातही

आम्ही सामील होतो

 

 

 

देणं घेणं येणं जाणं

रोजच असतं चाललेलं

कोणी कालवण दिलेलं

कोणी लोणचं आणलेल

 

सण असो उत्सव असो

सगळे सगळे जमतात

खाणं पिणं गप्पागाणी

आनंदात रमतात

 

 

दिवाळी असो ईद असो

ख्रिसमस बुध्द पौर्णिमा

सगळे मिळुन मनवतो

आणून सगळा लवाजमा

 

 

हेवेदावे द्वेष मत्सर

आमच्या इथे नाहीत

भांडणतंटे मारामाऱ्या

आमच्या इथे नाहीत

 

 

आम्ही शेजारी शेजारी

आनंदाने राहतो

सुखात आणि दु:खातही

शेजारधर्म पाळतो

 

 

अनुपमा जाधव (शिक्षिका)

के.एल.पोंदा.हायस्कूल डहाणू

भ्रमणध्वनी …८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा