You are currently viewing वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर…

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर…

सिंधुदुर्गनगरी 

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी, बरगढ (ओडीशा) यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकडून 1 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रवेश अर्ज सादर करण्यास कळविले आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2020 आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य नागपूर आयुक्त वस्त्रोद्योग डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिली.

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंघीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.diretexamah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे.  पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रवेश अर्ज प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर/सोलापूर/मुंबई यांच्या मार्फत सादर करावेत, असे आवाहनही  आयुक्त वस्त्रोद्योग डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =