You are currently viewing मालवणात १० रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव

मालवणात १० रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव

मालवणात १० रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव.*

मालवण

सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव २०२५ हा कार्यक्रम गुरुवार, १० जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षि व्यास अन् गुरुंची प्रतिमा यांचे पूजन, संत संदेश अन् साधकांचे अनुभव कथन, रामराज्याच्या स्थापनेसाठी नामजप, धर्मरक्षक अन् हिंदूत्वनिष्ठ यांचा सत्कार, लघुपट : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, व्याख्यान राष्ट्र-धर्म रक्षणार्थ साधना आणि युद्ध काळातील आपली राष्ट्र कर्तव्ये, हिंदूत्वनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा