You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा सत्र सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा सत्र सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजीनामा सत्र सुरूच

दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस व रस्ते आस्थापना सेलचे उपजिल्हा संघटक अभय देसाई यांचाही पक्षाला जय महाराष्ट्र.

मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांच्या राजीनाम्याची बातमी ताजी असतानाच
दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष तथा मांगेली ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस व रस्ते आस्थापना सेलचे उपजिल्हा संघटक इजि. अभय देसाई यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात येत्या काळात मोठे पडसाद दिसणार असून मनसेचा हा मोठा गट नेमकी काय भूमिका घेतो याची उत्कंठा लागून राहिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 17 =