You are currently viewing कळसुली सोसायटीवर श्री. देव भोगनाथ गिरोबा सहकार समृद्धी गाव पॅनलचा दणदणीत विजय…

कळसुली सोसायटीवर श्री. देव भोगनाथ गिरोबा सहकार समृद्धी गाव पॅनलचा दणदणीत विजय…

श्री.देव भोगनाथ गिरोबा सहकार समृद्धी पॅनलचे ११पैकी ११ जागा जिंकल्या…!तर स्वामी समर्थ पॅनल २
जगावर समाधान मानावे लागले.

कळसुली (वार्ताहर)

श्री.देव भोगनाथ,गिरोबा सहकार समृद्धी पॅनल, व स्वामीं समर्थ,या दोन पॅनल थेट लढत झाली होती.
या निवडणुकीत श्री. देव भोगनाथ गिरोबा सहकार समृद्धी पॅनल
११पैकी ११जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. तर श्री.स्वामी समर्थ पॅनल 2 जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजप मध्ये थेट लढत झाली होती.
श्री. देव भोगनाथ,गिरोबा सहकार समृद्धी पॅनेलने बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडीने सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

या विजयाचे शिल्पकार युवा राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक तसेच माझी सरपंच अतुल दळवी व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

कळसुली ग्रा.पं.उपसरपंच सचिन पारधीये यांचा मोठा धक्का बसला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस युवा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, माझी सरपंच अतुल दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी,यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा सोसायटीवर विजय मिळवला आहे.

श्री.देव भोगनाथ,गिरोबा सहकार समृद्धी प्रफुल्ल सुद्रीक,अतुल दळवी,चंद्रशेखर चव्हाण, रामचंद्र नाईक,राजेंद्र राऊत, रामचंद्र गावकर,लता सुद्रीक, सुनील कदम,नागोजी कोकरे,विजयी झाले आहेत.
तसेच स्वामी समर्थ पॅनलचे कविता दळवी,गणेश मठकर विजयी झाले आहेत.

यांचे कळसुली हायस्कुल समोर माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत, व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पुष्पहार घालत पेढे भरून अभिनंदन केले.
यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले, देव भोगनाथ, गिरोबा सहकार समृद्धी सोसायटीच्या निवडणूकित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांघिक काम केल्याने हा विजय मिळाला. असून गेल्या वर्षभरातील शेतकऱ्याच्या हिताचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचे सावंत त्यांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत साळगावकर यांनी काम पाहिले.

यावेळी माझी प.स. स.अभय घाडीगांवकर,तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब,सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी,जिल्हा युवा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अँड भरत घाडीगांवकर,नरेश दळवी, तातू गावकर, शाखा प्रमुख शिवसेना बाळा नाईक,युवा सरचिटणीस राष्ट्रवादी कॉग्रेस रुजाय फर्नांडिस,विजय गुरव, सत्यवान परब, बाबाजी मुरकर, दिलीप दळवी, जे.जे.दळवी,नंदकिशोर सुद्रीक,समीर शिर्के, किष्णा गावकर,नंदकिशोर परब,संतोष सुतार महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा